निरा नरसिंहपूर: दिनांक: २१.
प्रतिनिधी:डॉ. सिद्धार्थ सरवदे
नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लक्ष्मी नरसिंह चे दर्शन घेतले आणि निरा नरसिंहपुर ग्रामस्थ व इंदापूर भाजपा यांनी फडणवीस साहेबांचा सत्कार केला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माझी संसदीय मंत्री व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी फडणवीस साहेबांचा सत्कार केला .यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर साहेब, पृथ्वीराज जाचक, दौंड तालुक्याचे आमदार माननीय श्री राहुल कूल, माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील तसेच खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार रामसुख सातपुते, सौ अंकिता ताई पाटील ठाकरे,धैर्यशील मोहिते-पाटील तसेच इंदापूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी केले. यावेळी ते म्हणाले की पुणे जिल्ह्यामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये भाजपाचे संख्याबळ हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाला लोक हे भरभरून मतदान करतील व विजय करतील.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, बारा बलुतेदार अशा सर्व लोकांचे खूप मोठे मोठे प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील. सत्तेचा गैरवापर करणाऱ्याला नरसिंह देव हे वेगळा आशीर्वाद देतील व भाजपची सत्ताही पुन्हा महाराष्ट्रमध्ये येईल व आपण लोकांचे प्रश्न अगदी प्रामाणिकपणे व हिरीरीने सोडवू. त्यांनी सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधु व पोलीस प्रशासन यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन हे इंदापूर तालुका भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व नीरा नरसिंगपूर गावातील इंदापूर तालुका भाजपचे सचिव व माजी उपसरपंच विलास ताटे , प्रसिद्ध उद्योगपती किशोर तात्या मोहिते, प्रकाश काळे साहेब,माजी सरपंच हनुमंत काळे,सयाजी मोहिते सर,माजी सरपंच अण्णासाहेब काळे, भाजपच्या कट्टर कार्यकर्ते पप्पू गोसावी , पोलीस पाटील अभय कुमार वांकर, तंटामुक्त अध्यक्ष दशरथ राऊत, प्रसिद्ध उद्योगपती संतोष मोरे ,प्रसिद्ध उद्योगपती विजय सरवदे, सिनेअभिनेते व दिग्दर्शक नितीन सरवदे, वस्ताद सचिन कदम, माजी उपसरपंच नाथाजी मोहिते पाटील, शहाजी पावशे, विद्यमान उपसरपंच सुनील मोहिते, चेअरमन बाळासाहेब मोहिते पाटील, टनु गावचे सरपंच प्रतिनिधी सागर भैया मोहिते पाटील, व नीरा नरसिंगपूर व पंचक्रोशीतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. स्वागत सभेचा कार्यक्रम हा अतिशय भव्य आणि दिव्य आणि आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.
