श्रीपुर,
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा येथे गेली पस्तीस वर्षे सेवा करुन एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त झालेले व आज एक एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने भालचंद्र शिंदे पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा घेण्यात आला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात शिंदे पाटील यांचा ज्येष्ठ कार्यकर्ते भरत बनसोडे, तुकाराम बाबर यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांच्या कार्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन रामचंद्र सावंत पाटील यांचें हस्ते अरुण तोडकर व सावंत पाटील यांनी सत्कार केला. जागृती तरुण मंडळाचे संस्थापक व पत्रकार प्रकाश केसकर यांनी सत्कार केला. तसेच महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर कार्यालयात स्थावर व्यवस्थापक हेळकर साहेब यांनी कार्यालयाचे वतीने सत्कार केला. यावेळी शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा कार्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात सत्कार सोहळा प्रसंगी महादेव आठवले, मोहसीन पठाण, बी .टी. शिवशरण, नारायण खटके, श्रीपाद देऊसकर, जयंत भोसले, सदा पवार, भैय्या सुराणा, बबन उबाळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
