श्रीपुर,
आजपासून १२ वीच्या (HSC Board Exam) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा सुरू होत आहेत. गेल्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा होत आहेत.

श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका कनिष्ठ महाविद्याल, श्रीपूर येथे आज विद्यार्थ्यांचं कोरोणाच्या नियमांच पालन करून उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले.
या केंद्रावर एकूण – २८१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
यामध्ये १०० मुली व १८१ मुलांचा सहभाग आहे,
तर एकूण १२ स्वतंत्र सोयीयुक्त खोल्या (ब्लॉक) मध्ये त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोविड-१९ च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, राज्य बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.
बारावीची परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून, पहिले सत्र सकाळी १०.३० ते दुपारी २ तर,
दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत होणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रामध्ये बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा समावेश आहे.