🔅वीज ग्राहकांना मोठा दिलासा! 🔅
कोरोनाच्या काळात आलेले वीज बिल आपण भरले नसेल तर,
आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
कोरोनाच्या काळात आलेले वीज बिल आपण अजून भरले नसेल, आणि ती थकबाकी जर तुम्ही एक रक्कमी भरनार आसल ,
तर तुम्हाला त्यावरील व्याज व विलंब शुल्क माफ केले जाईल.

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख
यांच्या नावाने ही नवी योजना जाहीर करण्यात आल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
तसेच ते म्हणाले यामध्ये उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास – 5 टक्के रक्कम माफ केली जाणार आहे.
तर लघुदाब वीज ग्राहकांनी एक रक्कमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रक्कम माफ केली जाणार ,
अशी घोषणा नितिन राऊत यांनी केली आहे.