महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत आता बेरोजगाराना स्वयंम रोजगार मिळवून देण्यासाठी आर्थिक साहाय्यातून वाहने वितरित करण्यात येणार आहेत.
या योजने विषयीची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम राज्यभरातील बेरोजगारांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साडेतीन लाखांपर्यंत सबसिडी देण्यात येत असून, महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
