• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

चैताली डावरे हिच्या मृत्यूस कारणीभूत नराधमास करकम्ब पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे अभय का देत आहेत? महिला अत्याचारांच्या बाबत तेजस्विनी सातपुते गप्प का?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
August 23, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
चैताली डावरे हिच्या मृत्यूस कारणीभूत नराधमास करकम्ब पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे अभय का देत आहेत? महिला अत्याचारांच्या बाबत तेजस्विनी सातपुते गप्प का?

विशेष प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील चैताली किसन डावरे वय (२६) हिचा ऐन तारुण्यात विष प्रयोग होऊन दिनांक १७/८/२१ रोजी दुर्दैवी करून अंत झाल्याने पटवर्धन कुरोली व तिचे माहेर मगरवाडी (ता.माळशिरस) येथे सर्व जाती धर्माचे लोक हळहळ व्यक्त करून अश्रू गाळत आहेत.
याबाबत पोलिसात रीतसर तक्रार दाखल करताना मयत चैताली हिचे चुलत भाऊ कुमार आनंदा लोंढे यांनी म्हटले आहे की तिचे तिचे आई वडील दहा वर्षांपूर्वी मयत आहेत.तिचे लग्न १२/५/२०१३ रोजी मगरवाडी येथे मोठ्या थाटामाटात करून दिले.त्यानंतर दोन वर्षे त्यांनी तिला व्यवस्थित नांदवले परन्तु २०१५ पासून सतत शारीरिक मानसिक छळ,पैसे मागणी,मारहाण ,उपाशी ठेवणे,रीतिरिवाज वरून टोमणे, माहेरहून पैसे आणण्याची मागणी असा जाच हट्ट कायम होता याबाबत ती शेजारील लोकांच्या फोन वरून सांगत असे.पाठीमागील सहा महिन्यांपूर्वी तिने असाच फोन आपला भाऊ कुमार लोंढे यांना केल्याने व त्यांची पत्नी पंचशीला लोंढे यांनी जाऊन आणले व दीड महिना ठेवून तिचा पती किसन डावरे यास समजावून सांगून सासरी पाठवले.
दिनांक १७/८/२१ रोजी ५.३० च्या सुमारास कुमार लोंढे यांची मावस बहीण हिने फोन करून सांगितलं की चैताली चे काही कळलं का ? तिला ऍडमिट केले आहे? बघ बाबा काय झाले? त्यानंतर चैतलीचा भाऊ कुमार लोंढे यांना किसन डावरेचा संशय आल्याने पंढरपूर कॉटेज ( सिव्हिल हॉस्पिटल) ला लँडलाईन वर फोन लावून मी कुमार लोंढे बोलतोय माझी बहिण चैताली किसन डावरे हिस काय झाले ? कशी तब्येत आहे? अशी विचारणा केली असता ! पुढून उत्तर आले अहो ती मयत आहे ? कारण काय तर पोईजनींग( poison)? मी येतोय बॉडी मला पाहिजे म्हटल्यावर ते म्हणाले बॉडी पण घेऊन गेलेत .असे निष्ठुर व निर्दयी लोक म्हणजे मानवतेला काळिमा आहेत.माहेरच्या लोकांना न सांगता परस्पर प्रेताची विल्हेवाट लावण्याचा त्याचा इरादा होता.
यानंतर DYSP कदम पंढरपूर पोलीस निरीक्षक निंबाळकर यांचेशी संपर्क साधून करकम्ब पोलीस स्टेशन ला रीतसर तक्रार दाखल केली.
सदर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार मा.प्रशांत पाटील यांनी तक्रादारांचे सर्व म्हणणे ऐकून व्यवस्थित तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.आणि तक्रादर समोर मयत चैतली हीचा नवरा किसन डावरे व सासरा नामदेव डावरे यांना त्याच रात्री उचलण्याचे आदेश देऊन सकाळी सासू सुमन डावरे यांना दुसऱ्या दिवशी उचलण्याचे आदेश दिले परन्तु करकम्ब पोलीस स्टेशनचे पी एस आय मोरे यांनी वरिष्ठांचे आदेश पायदळी तुडवून आरोपीस फायदा मिळेल असे कृत्य केले.
त्या रात्री आरोपी किसन डावरे यास ताब्यात घेतले परन्तु तिचा सासरा व सासू बाबत मोरे यांना जरा जास्त प्रेम वाटते आहे?त्यांनी पोलीस स्टेशनला विना वर्दी प्रवेश करताच तक्रादारांस सिंघम स्टाईलने दमदाटी व नणंद यांची नावे टाकू नका असा सज्जड दम दिला ? कुमार लोंढे यांना बाहेर बाजूला घेऊन प्रकरण मिटवून घ्या तुम्हाला माहीत नाही भरपूर त्रास असतो? कोर्ट म्हणजे साधं काम नाही? तुमची बहीण माघारी येणार नाही? असे संत प्रवचन देऊन आज तक्रार दाखल करू नका असा दबाव आणला!
याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना कुमार लोंढे म्हटले की मी स्वतः सामाजिक कार्यात गेली वीस वर्षे कार्यकरत असून मानवाधिकार ,महिला अत्याचार बाबत आवाज उठवत आहे.व माझ्या बहिणीच्या बाबतीत न्याय न मिळाल्यास दोषी असणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या मोरे सारख्या अधिकाऱ्यावर महिला आयोग ,मानवाधिकार यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचा मनोदय ही व्यक्त केला. पुरोगामी महाराष्ट्र मध्ये अशा घटना घडू नयेत त्याकरिता आरोपीस कठोर शासन झाले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
याबत वरिष्ठ अधिकारी dysp कदम यांना १९/८/२१ रोजी वरील सर्व बाब सांगितली असता मी बोलून घेतो असे त्यांनी सांगितले परंतु आज दिनांक २०/८/२१ पर्यत आरोपी अटक नाहीत .
या जिल्ह्याच्या पोलीस प्रमुख एक महिला आहेत व एक महिलेचा क्रूर व नियोजन पद्धतीने विष प्रयोग करून अत्यंत निर्दयी असा आत्महत्या नव्हे तर हत्या आहे असे ही बोलले जात आहेत याबाबत पोलीस प्रमुख काय कारवाई करणार? Dysp चे आदेश ! ठाणे अंमलदार प्रशांत पाटील यांचे आदेश पायदळी तुडवण्याचे धाडस या करकम्ब पोलीस स्टेशनचे मग्रूर पी एस आय मोरे यास कोठून येते? अशा लोकांमुळे कायदा व सुव्यवस्था व अपप्रवृत्ती वाढत आहे आणि आरोपी ला अभय मिळत आहे?
चैताली हिच्या मृत्यूस कारणीभूत किसन डावरे पती,सुमन डावरे सासू,नामदेव डावरे सासरा यांचेवर दंड संहिता १८६० नुसार कलम ४९८ अ,३०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #chrs#cmo maharashtra#Domestic voilance#dysp#hemant jagdale#home minister maharashtra#solapur sp#supreme court#tejasvini satpute#अजित पवार#उद्धव ठाकरे#करकंब#घरगुती हिंसाचार#तेजस्विनी सातपुते#पंढरपूर#पोलीस निरीक्षक पंढरपूर#महिला अत्याचार#महिला आयोग#मानव अधिकार आयोग#सोलापूर ग्रामीण पोलीसDr kumar londheKumar londhe

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
तफिसा इंटरनॅशनल संस्था यांचा सोलापूर मध्ये भव्य कार्यक्रम- डॉ.प्रमोद कसबे

तफिसा इंटरनॅशनल संस्था यांचा सोलापूर मध्ये भव्य कार्यक्रम- डॉ.प्रमोद कसबे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .