• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

फडणवीसांचा FSI घोटाळा ?नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन क्लबवरून देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता; PIL दाखल .

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
July 11, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
फडणवीसांचा FSI घोटाळा ?नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन क्लबवरून देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता; PIL दाखल .

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 11 जुलै 2021:-

Narendra Mehata seven Eleven Club case: सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग नसताना येथे महामार्गचा संदर्भ देत अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर केले होते. मुख्यमंत्री कार्यालयास प्रतिवादी करण्यात आल्याने फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मीरा रोड – भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehata) यांच्या कंपनीच्या वादग्रस्त सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग नसताना येथे महामार्गचा संदर्भ देत अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर केले होते. मुख्यमंत्री कार्यालयास प्रतिवादी करण्यात आल्याने फडणवीस (Devendra Fadnavis) अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे . (Former CM Devendra Fadnavis in Trouble seven hills hotel issue.)
भाजपचे माझी आमदार नरेंद्र मेहता हे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्या चे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. फडणवीस हे मुख्यमंत्री तर मेहता हे आमदार असताना मेहतांच्या सेव्हन इलेव्हन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नाविकास क्षेत्र व भागशः सीआरझेड , कांदळवन ऱ्हास चे गुन्हे दाखल असताना क्लब व तारांकित हॉटेल साठी २०१८ साली अतिरिक्त एक चटईक्षेत्र मंजूर करण्यात आले. त्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत एक चटईक्षेत्र देण्याच्या निर्णयाचा आधार घेण्यात आला. वास्तविक सेव्हन इलेव्हन क्लब हा कोणत्याही राष्ट्रीय वा राज्य महामार्गावर नसताना हे अतिरिक्त चटईक्षेत्र मंजूर करण्यात आले.
विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून महापालिकेने देखील अतिरिक्त चटई क्षेत्र देत बांधकाम परवानगी व भोगवटा दाखला दिला. वास्तविक २०१६ साली देखील अतिरिक्त चटईक्षेत्र नाविकास विभागात मिळावे म्हणून प्रस्ताव दिले होते. परंतु नगर रचना संचालक पुणे यांनी अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावत विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे या ठिकाणी केवळ तळ अधिक एक मजला असे ९.७५ मीटर उंचीची इमारत बांधता येईल असे स्पष्ट केले होते. तसे असताना महापालिकेने बेसमेंट, तळ अधिक ४ मजली इमारत अतिरिक्त चटई क्षेत्रासह बांधण्यास परवानगी दिली.
या ठिकाणी कांदळवनचा ऱ्हास केल्याप्रकरणी २०१० पासून पाच गुन्हे महसूल विभागाने दाखल केले आहेत तर २२० केवीच्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या येथून जात आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी असून सुद्धा कारवाई ऐवजी पाठीशी घालण्याचे काम महापालिके पासून शासन यंत्रणेने केल्याचे आरोप होत आले आहेत. फय्याज मुल्लाजी यांनी सदरची जनहित याचिका केली असून त्यात मुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महापालिका, नगर रचनाकार व सेव्हन इलेव्हन हॉटेल कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
या शिवाय ७११ क्लब प्रकरणी नरेंद्र मेहता आदीं विरोधात फौजदारी याचिका दाखल आहे. आता जनहित याचिका दाखल झाल्याने मेहतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Tags: #fadanvis#देवेंद्र#देवेंद्र फडणवीसBJP

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या त्या ११ सरकारी कर्मचार्‍यांना केले बरखास्त…

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या त्या ११ सरकारी कर्मचार्‍यांना केले बरखास्त…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .