• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 19, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

चुंबन पडले महागात! आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा कोरोना काळातील चुंबनाचे फोटो आणि व्हीडिओ वायरल झाल्याने राजीनामा.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 30, 2021
in देश-विदेश, मनोरंजन, महाराष्ट्र
0
चुंबन पडले महागात! आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा कोरोना काळातील चुंबनाचे फोटो आणि व्हीडिओ वायरल झाल्याने राजीनामा.

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 30 जुन 2021:-

प्रेमी युगुलांना आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वात आकर्षक वाटते चुंबन. प्रेयसीचे चुंबन घेण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही आणि त्यात एकांत मिळाला तर आपण कोणत्या ठिकाणी आहोत ह्याचे भान सुद्धा अनेकांना राहत नाही. असाच प्रकार चक्क एका आरोग्यमंत्र्यांच्या बाबतीत घडला असुन कोरोना संसर्गाची भीती आणि भौतिक दुरितांचे पालन करण्याचे निर्देश असतानाही प्रेयसीचे चुंबन घेतानाचे फोटो आणि व्हीडिओ समाज माध्यमांवर वायरल झाल्याने होणार्‍या टीकेमुळे नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोरोना संकटात भौतिक दूरतेचा नियम मोडल्याबद्दल ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅकॉक यांना आपल्या एका चुकीमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी आपल्या कार्यालयात आपली सहकारी कोलाडंगेलोचे चुंबन घेतले. हे चुंबनच त्यांना भोवले. दोघे एकमेकांचे चुंबन घेतानाची चित्रफीत आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. अखेर आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांना राजीनामा देणे भाग पडले.
हँकॉक यांनी सहकारी कोलाडांगेलो हिचे चुंबन घेतल्याने ब्रिटनच्या नागरिकांनी त्यांच्यावर भौतिक दूरतेचा नियम मोडल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली गेली. यानंतर हँकॉक यांनी आज रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पाठवला आहे. कोरोनाच्या या संकटात मोठ्या संख्येत नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. यामुळे आपल्या हातून चूक झाल्यावर आपण त्याबाबत प्रामाणिक असले पाहिजे, असेही हँकॉक म्हणाले. पत्नीपासून तीन मुले
आरोग्यमंत्री मॅट हँकॉक ४२ वर्षांचे असून, १५ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना पत्नी मार्थापासून तीन मुले आहेत. ज्या मैत्रिणीसोबत त्यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सुरू आहे ती. देखील विवाहित आहे. या दोघांची भेट ऑक्सफोर्ड विद्यापीठात झाली होती, असे वृत्त ब्रिटनमधील एका संकेतस्थळाने दिले आहे. तसेच त्यांची मैत्रीण जिना कोलाडांगेलो ही देखील विवाहित असून तिच्या पतीचे नाव ऑलिव्ह ट्री असे असून, तिला तीन मुले आहेत.
मंत्रालयात दिली होती नोकरी
दरम्यान, आरोग्यमंत्री हँकॉक यांच्यासह जिना कोलाडांगेलोनेही आरोग्य मंत्रालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मैत्रिणीच्या नियुक्तीवरूनही हँकॉक यांच्यावर विरोधी पक्षांकडून सतत टीका करण्यात येत होती. कोलाडांगेलो हिला सप्टेंबर २०२० मध्ये मंत्रालयात गैरकार्यकारी संचालक पदावर नियुक्त केले होते. तिला वार्षिक १५ हजार पाऊंड पगार मिळत होता. तसेच तिला वर्षातून केवळ १५ ते २० दिवसच काम करण्याची मुभा दिली गेली होती. या नियुक्तीवरून विरोधी पक्षांनी हँकॉक यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला होता.
मॅट हॅकॉक आणि जिना कोलाडांगेलो यांचे प्रकरण समोर येताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. अखेर भौतिक दूरतेचा नियम मोडल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी २६ जून रोजी माफी मागितली आणि आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांना सोपविला.

Tags: #country#desh videshi#आरोग्य सेवा#देश विदेश

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
डॉक्टर्स डे” निमित्य सेवा सप्ताह कार्याची सुरवात डॉक्टरांनी सहभागी व्हावे – आयएमए अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे.

डॉक्टर्स डे” निमित्य सेवा सप्ताह कार्याची सुरवात डॉक्टरांनी सहभागी व्हावे – आयएमए अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .