• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Tuesday, June 24, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home क्रीडा

आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात – क्रीडा मंत्री सुनील केदार

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 30, 2021
in क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन, महाराष्ट्र
0
आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात – क्रीडा मंत्री सुनील केदार

एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेचे आयोजन!

ByNamdev Telange
JUN 30, 2021
img 20210630 wa0006

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.30 जून 2021:-

महाराष्ट्रात फुटबॉल खेळाला चालना मिळावी या उद्देशाने आशिया खंडातील सर्वात मोठी एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे.
सह्याद्री अतिथीगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेच्या तयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई जिल्हा फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.
क्रीडामंत्री केदार म्हणाले, एएफसी महिला आशिया कप 2022 या स्पर्धेमुळे राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या राज्यात फुटबॉल खेळाला चालना मिळावी आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियम सर्व मापदंडांवर सुसंगत आहेत. राज्यात स्पर्धेसाठी आणि सरावासाठी अद्ययावत खेळपट्टी उपलब्ध असल्याचेही केदार यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध यंत्राणांना सूचित करण्यात येईल. यामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, रस्ते, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, निवास अशा सर्व सुसज्ज सुविधा पुरविण्यात येईल. सर्व स्टेडियमच्या इमारतींची जर काही डागडुजी करणे गरजेचे असेल तर ती वेळेत करून घ्यावी, असे निर्देशही ठाकरे यांनी दिले.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, फुटबॉल स्पर्धा २० जानेवारी २०२२ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. यासाठी राज्य शासनाने योग्य नियोजन करावे. स्पर्धा जागतिक स्तरावरील असल्याने फुटबॉलप्रेमींना खेळाचा आनंद घेता यावा यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी करावी.प्रशिक्षण आणि सरावासाठी खेळपट्ट्या तयार करण्यात याव्यात असेही पटेल यांनी सांगितले.
राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि बालेवाडी येथे सामने होणार आहेत. ही स्पर्धा आशिया खंडातील महिलांसाठीची सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असून या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी सहभागी होणार आहेत. – ऑस्ट्रेलिया , जपान आणि चीन आधीच पात्र ठरले आहेत. इतर संभाव्य सहभागींमध्ये कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश होणार आहे. याकरिता खेळाचे मैदान सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: #क्रीडा#फुटबॉल#महिला2021फुटबॉल

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
सड़क हादसे में पुलिसकर्मी सहित 4 की मौत केस में ट्रैफिक इंस्पेक्टर गिरफ्तार, जानिए क्यों?

सड़क हादसे में पुलिसकर्मी सहित 4 की मौत केस में ट्रैफिक इंस्पेक्टर गिरफ्तार, जानिए क्यों?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .