अकलूज
होलार समाज अद्यापही विविध सुख सुविधा पासून वंचित आहे त्यामुळे या समाजाच्या सर्व अडचणी सोडवून या समाजाला सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी संधी देणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी व्यक्त केले.
नुकतीच मुंबई येथे होलार समाजाचे शिष्टमंडळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटले यावेळी पटोले यांनी होलार समाजाला आश्वस्त केले.
प्रदेश अध्यक्ष अ जा विभाग काॅंग्रेस मा विजयभाऊ अंभोरे,
माजी गृहमंत्री रमेशदादा बागवे यांच्या नेतृत्वात टिळकभवन दादर मूंबई येथे होलार समाजाचे विचारवंत अभ्यासक प्रा शहाजी पारसे,होलार समाजाचे यूवक नेते दयानंदजी ऐवळे,गणेशजी हेगडे,अॅड महादेव कांबळे,प्रा वाघमारे सर,नवनाथजी ढोबळे,चंद्रकांत पारसे,राम ढोबळे मा तानाजी ऐवळे वसंतदाद तोरणे यानी होलार समाजाच्या प्रश्नावरती नानाभाऊ पटोले यांना होलार समाजाच्या व्यथा कथन केल्या. समाजातील सामाजीक शैक्षणीक आर्थिक
राजकीय प्रगतीसाठी होलार समाजाचे महामंडळ निर्माण व्हावे, होलार समाजातील जातीच्या चूकीच्या नोंदी दूरुस्ती होणेसाठी होलार समाज अभ्यास अयोग नेमावा,होलार समाजाला चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे, होलार समाजातील चर्मकार महामंडळातील एकूण निधीपैकी 25 टक्के निधी होलार समाजासाठी स्वतंत्र मिळावा.होलार समाजातील वाद्य कलावंताना पेन्शन योजनेसाठी जाचक वयाची अट रद्द करुन प्रत्येक कलावंताना पेन्शन दरमहा पाच हाजार रुपये मिळावी, होलार समाजातील भूमिहीन समाजबांधवाना गायरान जमिन कसण्यासाठी मिळावी, होलार समाजाला दादासाहेब गायकवाड स्वालंबन योजनेतील प्रकरणे तात्काळ मंजूर करुन समाजाला विकासासाठी मदत करावी.
होलार समाजातील विद्वान समाजबांधवाना साहित्य कला क्रिडा चरित्रसाधने अभ्यासमंडळ विद्यापीठ सिनेट आधिसभा या विभागावरती समाजातील बांधवाना संधी मिळावी.कला क्रिडा साहित्य प्रांतातुन
विधानपरीषदेवरती होलार समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, होलार समाज हा वंचित उपेक्षीत पिचलेला कष्टकरी गरिब भोळा भाबडा समाज आहे याची जाणीव मला आहे या समाजातील अनेक प्रश्नाची मला जाणीव आहे या होलार समाजाला ताकद देण्याची आणि समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी माझा पक्ष कटिबध्द आहे. याप्रसंगी झालेल्या चर्चेनंतर होलार समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.