• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

दुधात खुलेआम भेसळ करून माजले पांढरे बोके..? अन्न व औषध प्रशासनाने दुधाच्या शुद्धतेवर करडी नजर ठेवण्याची गरज

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 25, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा
0
दुधात खुलेआम भेसळ करून माजले पांढरे बोके..? अन्न व औषध प्रशासनाने दुधाच्या शुद्धतेवर करडी नजर ठेवण्याची गरज

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 25 जून 2021:-

सर्वसामान्य नागरिकांचे पूर्णान्न किंवा सकस आहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ करून कृत्रिम दुधातून लाखोंची आर्थिक उत्पन्न मिळवणारी मोठी टोळीच सर्वत्र सक्रिय झाली असल्याची चर्चा जोर धरत आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात अविभाज्य घटक असलेल्या दुधात युरिया पाम तेल दुधाची पावडर आणि मेलामाइन सारखे विषारी रसायन मिसळवुन स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा गोरखधंदा दूध संकलन करणाऱ्या मंडळींनी मांडला असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दुधात मोठ्या प्रमाणात विषारी पदार्थ मिसळून दररोज लाखो रुपये मिळविणारी अशा “पांढऱ्या बोक्यांची टोळीच माजली” असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. निसर्गतः दुष्काळी असलेल्या महाराष्ट्र राज्यातील शेती बेभरवशाची असल्याने अनेकांचे संसार दूध उत्पादनावर सुरू आहेत,


परंतु गेल्या काही वर्षांपासून दूध संघाच्या बरोबरच इतर खासगी संस्थाही दूध संकलन आणि दूध प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे गोरगरिबांचे पूर्णान्न असलेल्या दुधाच्या या गुणवत्तेवर आणि विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. दररोज लाखो लिटर दुधाचे संकलन होत असतानांही गेल्या या काही वर्षात अन्नभेसळ विभागाची कोणतीही कार्यवाही न झाल्याने सर्व काही आलबेल आहे की गोलमाल आहे? हे नक्की सांगता येत नाही. लहान बालकापासून ते वृद्ध नागरिकापर्यंत प्रत्येकांच्या आहारात हमखास आढळणारा अन्नपदार्थ म्हणून ओळख असलेल्या दुधात सध्या युरिया, दुधाची पावडर आणि अन्य आरोग्यास घातक रसायने मिसळून दुधाचा गोरखधंदा मांडलेल्या पांढरपेशा बोक्यांवर प्रशासनाने करडी नजर ठेवून दुधात भेसळ होणार नाही याकडे अन्नभेसळ प्रशासनाने लक्ष देणे खूप आवश्यक आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दुधात भेसळ करण्याचा गोरखधंदा सर्वत्र तेजीत असल्याचे बोलले जात आहे. सध्या दुधात भेसळ करण्याचे प्रमाण आणि संबंधित प्रशासनाच्या कार्यवाहीकडे पाहता पांढरपेशा बोक्क्यांचा हा गोरखधंदा प्रशासनाच्या वरदहस्ताने तरी सुरू नाही ना??असाच प्रश्न आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
भेसळयुक्त दूध म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळच असल्याचे सामान्य व नोकरदार नागरिकांतून बोलले जात आहे.अन्न व औषध प्रशासनाने दुधाच्या शुद्धतेवर लक्ष ठेवून सामान्य लोकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तत्काळ थांबवावा. आणि दररोज दुधात हजारो लिटर भेसळ करून त्यातून लाखो रुपये मिळवून स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळाव्या अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Tags: #milk#दूध#भेसळदुधात भेसळ

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
सीबीआय व ईडीने राममंदिर जमीन खरेदी घोटाळ्याचा तपास करणार का❓ संजय राऊत यांनी उभा केला प्रश्न.

सीबीआय व ईडीने राममंदिर जमीन खरेदी घोटाळ्याचा तपास करणार का❓ संजय राऊत यांनी उभा केला प्रश्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .