गडचिरोली :विभागीय प्रतिनिधी , चक्रधर मेश्राम दि. 24 जून 2021:-
गडचिरोली शहरातील फुले वॉर्ड क्रमांक 2 मध्ये वास्तव्य करीत असलेले, जिल्ह्यात सुपरिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपूरे यांचा त्यांचे राहते घरातच खून करण्यात आला. वार्डातील एक त्यागी व निस्वार्थी वृत्तीचा कार्यकर्त्याच्या खूनामुळे शहरात फार मोठी दहशत पसरलेली असून या घटनेने शंका कुशकेला पेव फुटले आहे . वार्डात अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून या घटनेचा वार्डातील व शहरातील लोकांनी निषेध नोंदविलेला आहे. सदर घटनेची माहिती कळताच. त्याच्या चाहत्यांनी गर्दीने सम्पूर्ण परिसर फुलून निघाला. सदर मृतकाचे प्रेत शवविच्छेनदा साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलेले असून सदर घटनेची चौकशी गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्वानपथकाच्या साहाय्याने मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरू आहे. खून करणारे मारेकरी फरार झाले असून मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरू आहे.