• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग महामारीत शाहू महाराज यांनी केलेले कार्य आजही अनुकरणीय-प्रा.डॉ.विलासराव पोवार

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 7, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग महामारीत शाहू महाराज यांनी केलेले कार्य आजही अनुकरणीय-प्रा.डॉ.विलासराव पोवार

सव्वाशे वर्षांपूर्वीच्या प्लेग महामारीत शाहू राजांनी केलेले कार्य आजही अनुकरणीय

  • प्रा. डाॅ. विलासराव पोवार.

‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेगच्या महामारीत राज्यकर्त्याच्या भूमिकेतून मानवतेचा दृष्टिकोन ठेवत प्रशासकीय, प्रबोधन, आरोग्य, उपचार, आर्थिक मदत, पुर्नवसन या पातळ्यांवर केलेल्या शास्त्रशुद्ध उपाययोजना आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक तसेच अनुकरणीय आहेत.’ असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डाॅ. विलासराव पोवार यानी केले.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या जून अंकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ता म्हणून डॉ. पवार ‘प्लेगच्या साथीतील शाहू महाराजांचे कार्य’ या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे होते.

शाहू महाराजांनी,त्याकाळी रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केले,अपंग दिनदुबळे व गरजूंसाठी अन्नदानाची सोय केली.मजुरांना काम उपलब्ध केले .सर्व धर्माच्या यात्रा-जत्रावर बंधने घातली. साठेबाजी करून महागाई करणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवले .

प्लेगने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन दिली “, जनतेचे दागदागिने मौल्यवान वस्तू राजदरबारातील तिजोरीत सुरक्षित ठेवण्याची सोय केली. प्लेगची लस सर्वप्रथम स्वत टोचून घेतली, लस टोचून घेणार्यास रजा, रोख बक्षिसे जाहिर केली.

शाहू महाराजांनी लोकानुनय न करता प्लेग निर्मूलनासाठी जे जे शास्त्रीय उपाय आहेत त्यांची कठोर अंमलबजावणी केली. अशा अनेक उपाय योजनांची माहिती डॉ. पवार यांनी शाहू महाराजांनी प्रसृत केलेला प्लेगविरोधी जाहीरनामा, करवीर सरकारचे गॅझेट व वेळोवेळी काढलेल्या अधिकृत हुकुमाधारे दिली.

देशातील इतर संस्थानात व ब्रिटिश अमलात प्लेग धुमाकूळ घालत असताना कोल्हापूर संस्थानात मात्र शाहू महाराजांनी अतिशय शास्त्रीय पद्धतीने प्लेगच्या महामारीवर नियंत्रण ठेवण्याचा व संस्थानातील शेवटातील शेवटच्या माणसाच्या संरक्षणाचा विचार करीत कशा उपाययोजना केल्या याचे तपशीलवार विवेचन डॉ. पवार यांनी आपल्या भाषणात केले.

व्याख्यानापूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या हस्ते जूनच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तात्राच्या जून २०२१ अंकाचे प्रकाशन झाले .

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ‘जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही ज्याला शाहू राजाचा स्पर्श झालेला नाही’ असे प्रतिपादन करीत शाहू महाराज व आजचे राज्यकर्ते यांची तुलना करताना ते पुढे म्हणाले , पंचवीस वर्ष वय असणारे तरूण शाहू राजे प्लेग महामारीवर मात करताना वैज्ञानिक दृष्टिकोन वापरत होते पण आजचे राज्यकर्ते, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा असले भंपक कार्यक्रम करत आहेत. महाराजांनी टीका करणाऱ्या वृत्तपत्रानाही मोठ्या मनाने मदत केली तर आजचे राज्यकर्ते माध्यमांची मुस्कटदाबी करतात.” असे प्रतिपादन करून “राज्यकारभार करताना अडचण आली तर शाहूंनी केलेल्या कार्याचा अभ्यास करावा म्हणजे त्यांना मार्ग सापडेल” ,असा सल्ला चोरमारे यांनी आजच्या राज्यकर्त्यांना दिला.

कार्यक्रमाची सुरुवात अण्णा कडलास्कर यांच्या शाहू राजांवरील स्वरचित गीताने केली. प्रास्ताविक व ओळख अनिल चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर गायकवाड यांनी केले .सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. कार्यक्रमास राज्यभरातील २०० अंनिस कार्यकर्ते ऑनलाईन उपस्थित होते.

Tags: अनिसप्रा पोवारशाहू महाराजसातारा

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान ने अन्न वाटप व कपडे वाटप मुंबई परिसरात कौतुकास्पद कार्य

आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान ने अन्न वाटप व कपडे वाटप मुंबई परिसरात कौतुकास्पद कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .