• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

तालुक्यातील 24 हॉस्पिटलचे होणार लेखापरीक्षण; कोरोना काळात लूट करणाऱ्या हॉस्पिटल वर होणार कारवाई?

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
June 5, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
तालुक्यातील 24 हॉस्पिटलचे होणार लेखापरीक्षण; कोरोना काळात लूट करणाऱ्या हॉस्पिटल वर होणार कारवाई?

कोरोनावर उपचार करणाऱ्या 24 हॉस्पिटलचे लेखापरीक्षण होनार

आंबेडकरी चळवळीचे शिलेदार विकास धाइंजे,वैभव गिते या जोडीच्या प्रयत्नांना यश

लेखापरीक्षण प्रामाणिकपणे केल्यास सत्य बाहेर येईल..विकास दादा धाइंजे.

लेखापरीक्षनाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवणार..वैभव गिते.

कोरोना कोविड 19 या बाधित रुग्णांच्या व नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बिलांबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांच्याकडे केल्या होत्या याची दखल घेऊन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेने मुख्यमंत्री महाराष्ट्र व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अकलूज यांनी दि.27 मे 2021 रोजी माळशिरस तालुक्यातील 24 हॉस्पिटलचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढले आहेत या आदेशात
रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांचे देयकांचे लेखापरीक्षण कारणेकामी लेखा परीक्षण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.लेखा परीक्षण पथकाचे नोडल ऑफिसर श्री.डी.एच. मिसाळ हे दि.1जून 2021 पासून रजेवर जात असल्याने लेखापरीक्षणात खंड न पडता,लेखा परिक्षणाचे काम नियमितपणे सुरू राहील,यादृष्टीने मिसाळ यांचे जागी इतर अधिकारी यांची श्रीमती यु.आर.देसाई,नायब तहसीलदार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
एकूण 24 हॉस्पिटल चे लेखापरीक्षण नोडल अधिकारी श्रीमती देसाई नायब तहसीलदार यांचे निरीक्षनाखाली इतर अधिकारी व कर्मचारी यांनी करावयाचे आहे.
यामध्ये 1)अश्विनी हॉस्पिटल अकलूज,2)अकलूज क्रिटिकेअर हॉस्पिटल अकलूज,3)हेगडे हॉस्पिटल अकलूज 4)कदम हॉस्पिटल अकलूज 5)अभय क्लिनिक अकलूक 6)राणे हॉस्पिटल अकलूज 7)देवडीकर हॉस्पिटल अकलूज 8)सन्मिती हॉस्पिटल अकलूज 9)गुजर हॉस्पिटल अकलूज 10)अश्विनी हॉस्पिटल नातेपुते 11)वाघमोडे हॉस्पिटल नातेपुते 12)अश्विनी हॉस्पिटल नातेपुते (ICU)
13) अकलाई ICU हॉस्पिटल,अकलूज 14)निदान हॉस्पिटल,श्रीपुर,15) स्रेयश हॉस्पिटल श्रीपुर 16) नातेपुते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 17) आर्या हॉस्पिटल,नातेपुते 18)देवडीकर हॉस्पिटल अकलूज
19)श्रीराम चाईल्ड हॉस्पिटल,संग्रामनागर 20)माने-देशमुख हॉस्पिटल वेळापूर 21)गायकवाड हॉस्पिटल अकलूज 22)नवजीवन हॉस्पिटल अकलूज 23)वरद हॉस्पिटल माळशिरस 24)माळशिरस कोव्हिड हॉस्पिटल इत्यादींचे लेखापरीक्षण होणार असून लेखापरीक्षणाचा दैनंदिन अहवाल प्रांत यांचे सहीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवणे बंधनकारक आहे.
हॉस्पिटलचे लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांची कर्तव्य
1) मुख्य सचिव महाराष्ट्र शासन अधिसूचना 21 मे 2020 मधील निर्देशांचे खाजगी रुग्णालयांकडून काटेकोरपणे पालन होते किंवा कसे?
2)एकूण बेडच्या 80 टक्के बेडचे दर हे शासनाने नियमित केलेल्या दरानुसार आकारण्यात यावे.उर्वरित 20 टक्के बेडसाठी रुग्णालयाचे प्रचलित दरानुसार दर आकारण्यात यावेत.त्याप्रमाणे आवश्यक बेडची उपलब्धता करण्यात आली आहे किंवा कसे? याची तपासणी करने.
3) सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील अधिसूचना दि.21.5.2020 अन्वये कोरोना रुग्णांना ऍडमिट व डिस्चार्ज केले जाते किंवा कसे ?
4)शासकीय अधिसूचनेनुसार कोव्हिड व इतर रुग्णांसाठी दर अनुसुचि ब व क मधील निर्धारित दराप्रमाणे आकारण्यात येते किंवा कसे ?याबाबत खात्री करणे
5)कोव्हिड 19 ची लक्षणे नसलेल्या रुग्णांना आवश्यकता नसताना अतिदक्षता विभागामध्ये बेड देण्यात आहेत काय?याची तपासणी करणे
6)कोव्हिड 19 रुग्णांना खाजगी रुग्णालये नियमानुसार वाजवी देयके आकारतात किंवा कसे?याची आठवड्यातुन दोनदा तपासणी करणे
7)कोव्हिडं 19 रुग्णाची देयकबाबत तक्रार असल्यास सदर तक्रारीचे तात्काळ निराकरण करणे
सदरकामी कुचराई केल्यास संबंधीतांवर केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,2005 चे कलम 56 अन्वये तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला,असे मानण्यात येईल.असे उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी दि.27 मे 2021 रोजीच्या आदेशात म्हंटले आहे.
माळशिरस तालुक्यातील जनतेने रुग्णालयांच्या मनमानी कारभाराची माहिती आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धाइंजे ,नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती.

Tags: #आरोग्य सेवाCmomaharashtraHealthHealth departmentआरोग्य विभागआरोग्य विभाग महाराष्ट्रआरोग्यमंत्रीजिल्हा आरोग्य अधिकारी

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
ना.विजय वडेट्टीवार अनलॉक बाबत बोलले ; विरोधकाच्या टिकेला उत्तर

ना.विजय वडेट्टीवार अनलॉक बाबत बोलले ; विरोधकाच्या टिकेला उत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .