सैराट फेमअभिनेत्री रिंकूच्या वाढदिवसानिमित्त वडील महादेव राजगुरू, आई आशा राजगुरू यांच्या उपस्थितीत वेगळ्या पद्धतीने व समाजपयोगी काम करून साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील मायनर, मुंडफणेवाडी, भोसलेवस्ती, काळेवस्ती, घारमाळकरगट, रेडेवस्ती, जमदाडेवस्ती, लाटेवस्ती, श्रीपूर या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या व पालकांना मोफत वाफेचे मशीन वाटप करण्यात आले.
अनावश्यक खर्च टाळून कोरोना काळात शाळेची गरज ओळखून सामाजिक भान राखत सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री रिंकू राजगुरू हिने व तिच्या कुटुंबीयांनी वाढदिवसानिमित्त केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे महाळुंग परिसरातील सर्व शाळांतील तीनशे विद्यार्थ्यांच्या पालकांना रिंकूच्या शुभहस्ते मोफत वाफेचे मशीन वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी केंद्रप्रमुख मा.हर्षवर्धन नाचणे, अशोक राजगुरू, अजित पवळ, प्रशांत चिंचकर इ उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी, सुभाष मिसाळ, समीर लोणकर, दशरथ डोलारे, राहुल थोपटे, दत्तात्रय पराडे, संगिता धोत्रे, कृष्णदेव माने, दिलीप उकिरडे व मुख्याध्यापक तसेच अंकुश वाघमारे, मनिषा नरुटे, रेहाना तांबोळी हे शिक्षक उपस्थित होते परिसरातील पालक ही उपस्थित होते.