भूषण कडू याची पत्नी कादंबरी (39) यांचे शनिवारी कोरोनामुळे निधन झाले. यामुळे कडू कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी भूषण आणि कादंबरी यांना कोरोनाची लागण झाली होती. भूषणवर बोरीवलीमध्ये तर कादंबरी यांच्यावर ठाणे येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, कादंबरी यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना केईएममध्ये दाखल केले होते.
नाटकादरम्यान झाली होती ओळख
कादंबरी ही सोमय्या कॉलेजची विद्यार्थिनी असून तीदेखील अभिनयाशी निगडित होती. ती नाटकाचे बॅकस्टेज सांभाळत असे. भूषणसोबत तिची ओळख एका नाटकादरम्यान झाली होती. ‘बिग बॉस मराठी’मध्ये भूषण स्पर्धक होता. त्यावेळी फॅमिली स्पेशल भागात कादंबरी आणि मुलगा प्रकीर्त (8) यांनी घरात एंट्री घेतली होती. लग्नानंतर तिने अभिनयाच्या क्षेत्रात काम न करण्याचा निर्णय घेतला होता, असे भूषणने सांगितले होते.