• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Wednesday, June 25, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

दारू अड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; पो.निरीक्षकसह पोलीस गंभीर जखमी

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
May 28, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
दारू अड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; पो.निरीक्षकसह पोलीस गंभीर जखमी

माळशिरस/ प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वेळापूर पोलीस ठाण्याचे स्वत: पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,

वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर पारधी समाजाची वस्ती आहे.तिथे अवैध हातभट्टी दारुचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे ही हातभट्टी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत तिथे फारशी मोठी कारवाई केली नव्हती. दरम्यान, पोलीस आज (28 मे) संध्याकाळी पारधी वस्तीत गेले. तिथे त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. काही लोकांची चौकशी केली. मात्र, यावेळी मोठा गदारोळ झाला.

महिला आणि पुरुषांचा पोलिसांवर हल्ला

पारधी वस्तीमध्ये 20 ते 25 महिला आणि पुरुषांनी मिळून थेट पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी पोलिसांनी जमावाला प्रतिकार करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. मात्र, जमावावर ताबा मिळवणं हे पोलिसांच्या अवाक्याबाहेर होतं. या गदारोळात दोन पोलीस गंभीर जखमी झाले. तर एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

पोलीस गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

जमावाच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले. तर पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना सध्या वेळापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

अद्याप कुणालाही अटक नाही

विशेष म्हणजे पोलीस निरीक्षकच गंभीर जखमी असल्याने हे प्रकरण आता जास्त संवेदनशील बनलं आहे. याप्रकरणी जमावाविरोधात शनिवारी (28 मे) मोठी कारवाई होण्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

अवैध धंद्यावल्याची मस्ती एवढी कशी वाढते?

माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी दारू ,मटका,जुगार, अवैध वाळू उपसा,खाजगी सावकारी असे अनेक खाकी वर्दीच्या साक्षीने व आशीर्वादाने काळे कारनामे चालू आहेत कारण काय तर अर्थपूर्ण व्यवहार? त्यामुळे चांगले काम करणारे लाच न स्वीकारणारे अशा रोषाला सामोरे जाऊन गंभीर होत आहेत.यावर जिल्हा पोलीसप्रमुख व अकलूजचे Dysp नीरज राजगुरू काय कारवाई करतात हे पाहणे महत्वचे आहे

उद्याच्या बातमीत वाचा . ..रात्रीस खेळ चाले तू चोर मै पोलीस !

#spsolapur #सोलापूर #cmomaharashtra

Tags: #attack police#cmomaharashtra#hemantnagrale#homeminister#policeattack#solapurgraminpolice#solapursp

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
मराठा आरक्षण ; आंबेडकर व शिव शाहूंचे वंशज एकत्र! काय चर्चा झाली भेटीत

मराठा आरक्षण ; आंबेडकर व शिव शाहूंचे वंशज एकत्र! काय चर्चा झाली भेटीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .