मुंबई पोलिसांनी बलात्काराचचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या डी एन नगर पोलीस ठाण्यात एका ३० वर्षीय ब्युटीशियन महिलेने हेगडे याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे.
या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार गेल्या जून मध्ये एका फिल्म शुटींग दरम्यान हेगडेची भेट झाली. प्रत्यक्षात ही महिला आठ वर्षापूर्वी कुमार हेगडे यांच्या संपर्कात आली होती. पण जून मध्ये भेट झाल्यावर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि नंतर आई आजारी आहे, तिला भेटायला जातो असे सांगून आणि या महिलेकडून ५० हजार रुपये घेऊन हेगडे गेला.