*कोव्हिड संदर्भात माळशिरस तालुक्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे – युवासेनेचे स्वप्निल वाघमारे यांची मागणी*
प्रतिनिधी:- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने माजी मंत्री शिवसेना संपर्कप्रमुख आ डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पंढरपूर विभागातील कोरोना महामारीचा आढावा व याचा सामना करण्यासाठी काय उपाय योजना करता येऊ शकतात या विषयी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक बोलावली होती. यावेळी COVID-19 संदर्भात माळशिरस तालुक्यातील ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, अपुरा लस पुरवठा, व्हेंटिलेटर बेडची दुरवस्था, इंजेक्शन्स उपलब्धता, कोविड केअर सेंटर मधील औषध गोळ्यांचा तुतवडा, विद्युत दहनीची आवश्यकता अश्या अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी माळशिरस तालुक्यातील सध्या चालू असणाऱ्या अकलुज व महाळुंग येथील कोविड केअर सेंटर मधील उपचार घेत असणाऱ्या 250 रुग्णांना गेल्या एक महिन्यापासून कोणत्याही प्रकारच्या औषध गोळ्यांचा पुरवठा होत नाही. यामुळे दुर्दैवाने असे रुग्ण covid सेंटरला न राहता घरीच राहणे पसंत करत आहेत. त्यांना तात्काळ गोळ्या औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार स्तरावर प्रयत्न करावेत, तसेच काही दिवसापूर्वी वाघमारे यांनी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांना केलेल्या मागणी नुसार उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथील रुग्णालयात गोरगरिबांसाठी व्हेंटिलेटर बेडची योजना उपलब्ध झालेली आहे परंतु व्हेंटिलेटर ऑपरेटर व त्यासाठी लागणारे तज्ञ फिजिशियन न मिळाल्याने अध्याप ते व्हेंटिलेटर चालू करता आले नाहीत तरी हे व्हेंटिलेटर चालू करण्यासाठी फिजिशियन म्हणून तज्ञ डॉक्टरांची तात्काळ नेमणूक करून घ्यावेत व तसे आदेश संबंधित प्रशासनाला देण्यात यावेत यासाठी स्वप्निल वाघमारे यांनी आमदार तानाजीराव सावंत साहेब यांना या आशयाचे लेखी निवेदन दिले आहे.
या बैठकीसाठी जिल्हा समन्वयक प्रा शिवाजीराव सावंत साहेब, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ भाऊ आभंगराव, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे, अनिल दादा सावंत, जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर, शिवसेनेचे सर्व उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील भैया वाघमारे, युवासेना जिल्हा चिटणीस दत्तात्रय गोरे, युवासेनेचे सर्व तालुका, शहर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.