• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home देश-विदेश

सचिन वाझे व मानसुख हिरेन प्रकरणाला नवे वळण ; भाजपा नेत्याचे कनेक्शन

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 17, 2021
in देश-विदेश, महाराष्ट्र, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा
0
सचिन वाझे व मानसुख हिरेन प्रकरणाला नवे वळण ; भाजपा नेत्याचे कनेक्शन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी सापडलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडून ‘एनआयए’च्या पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. मात्र, या गाडीसोबत भाजप (BJP Leader) नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) यांनी केला आहे.
यासंदर्भात सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी फोटो ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच, यावरून या प्रकरणाला आता वेगळे वळण येण्याची शक्यता असून पुन्हा राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे. मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके (Deven Hemant Shelke) यांचा फोटो आहे.

याचबरोबर, देवेन शेळके यांची 17 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. याबाबतचे नियुक्ती पत्र सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तसेच, मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.
दरम्यान, सचिन वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने मंगळवारी रात्री एका ठिकाणाहून काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली. त्याच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते.

याचबरोबर जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओमध्ये जी नंबरप्लेट वापरली होती, ती त्यामध्ये सापडली आहे. या गाडीचा वापर वाझे करीत होते. त्यांनी ती कोठून घेतली, त्याचा वापर ते कशासाठी करीत होते, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे महानिरीक्षक शुक्ला यांनी सांगितले. दरम्यान, ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांनी संशयास्पद मृत्यूपूर्वी याच गाडीतून प्रवास केला होता, असे समजते.

जानेवारीत केली मर्सिडीजची ऑनलाइन विक्री
मर्सिडीजचे मूळ मालक धुळ्यातील सारांश भावसार आहेत. जानेवारीत त्यांनी गाडीची ऑनलाइन विक्री केली होती. ‘कार २४’ या वेबसाईटवरून त्याचा व्यवहार केला होता. त्यामुळे कार विकत घेणाऱ्या दुसऱ्या पार्टीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. तपास यंत्रणेने आपल्याशी संपर्क साधलेला नाही, त्यांनी विचारणा केल्यानंतर आपण सर्व माहिती देऊ, असे भावसारने एका वृत्तवहिनीला सांगितले.

Tags: BJPBjp maharashtraMansukhMansukh hoteSachin vazeShivsenaकाँग्रेस

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
धनंजय मुंडेच्या दुसऱ्या पत्नी राजकारणात ;करुणा शर्मा कोण आहेत

धनंजय मुंडेच्या दुसऱ्या पत्नी राजकारणात ;करुणा शर्मा कोण आहेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .