• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Friday, June 27, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी केली तीन तलाठ्यांना मारहाण

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 17, 2021
in Uncategorized
0

कारवाईच्या मागणीसाठी तलाठी संघटनेचे लेखनीबंद आंदोलन इस्लामपूर / प्रतिनिधी : प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना सोमवारी रात्री

कारवाईच्या मागणीसाठी तलाठी संघटनेचे लेखनीबंद आंदोलन

इस्लामपूर / प्रतिनिधी : प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना सोमवारी रात्री आठच्या सुमारास प्रांत कार्यालयात बोलवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार संबंधीत तलाठ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सांगली जिल्हा शाखेने प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई होईपर्यंत उद्यापासून वाळवा उपविभागातील तलाठी व मंडलाधिकारी हे लेखणीबंद आंदोलन करीत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अविनाश आनंदराव पाटील, महादेव रामचंद्र वंजारी, अमर मारुती साळुंखे अशी मारहाण झालेल्या तलाठ्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अविनाश आनंदराव पाटील, महादेव रामचंद्र वंजारी, अमर मारुती साळुंखे अशी मारहाण झाली म्हणून जिल्हाधिकार्यांच्याकडे निवेदनाद्वारे कळवलेल्या तलाठ्यांची नावे आहेत.

त्यांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी स्वतः व शिपाई पंडीत कानडे यांच्याकरवी कार्यालयीन वेळेनंतर फोनवरुन अविनाश आनंदराव पाटील, महादेव रामचंद्र वंजारी, अमर मारुती साळुंखे आम्ही तिघांना प्रांत कार्यालयात भेटावयास बोलावून घेतले. त्यांच्या फोनवरुन दिलेल्या निरोपावरुन आम्ही तिघे तलाठी इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयात पोहचलो. त्यानंतर प्रांताधिकार्यांनी अमर साळुंखे यांना पहिल्यांदा ऑफीसमध्ये बोलावून घेत शिवीगाळ करुन व मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करुन मारहाण केली. प्रांताधिकारी नागेश पाटील हे आमच्या सोबत पुर्वग्रहदुषित वृत्तीने वागत आहेत. तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. या मागणीचे निवेदन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेला दिले आहे. तसेच या तक्रारीची दखल घेत सांगली जिल्हा तलाठी संघटनेने प्रांताधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रांताधिकारी नागेश पाटील माझ्याशी व इतर बर्‍याच तलाठ्यांशी पुर्वग्रह दुषित वृत्तीने वागत आहेत. त्यातूनच त्यांनी आम्हा तिघाजणांना मारहाण केली आहे. -अविनाश पाटील, तलाठी

*“मी ही माणूस आहे. वैयक्तीक पातळीवर जाऊन काही लोक माझ्याबाबत चुकीच्या चर्चा करतात. मी त्यांना याबाबत विचारणा केली आहे. मारहाणीसारखा कोणताही प्रकार घडलेला नाही. – प्रांताधिकारी नागेश पाटील.”*

कारवाईच्या मागणीसाठी तलाठी संघटनेचे लेखनीबंद आंदोलन

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
सचिन वाझे व मानसुख हिरेन प्रकरणाला नवे वळण ; भाजपा नेत्याचे कनेक्शन

सचिन वाझे व मानसुख हिरेन प्रकरणाला नवे वळण ; भाजपा नेत्याचे कनेक्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .