• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र

बनावट दाखल्याचे मोठं रॅकेट ; आरोपी शिवसद्ध बुळळा ! खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जात वैधता प्रमाणपत्र सह अनेक जन आरोपीच्या पिंजऱ्यात …

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
March 13, 2021
in महाराष्ट्र, माळशिरस तालुका, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर जिल्हा
0
बनावट दाखल्याचे मोठं रॅकेट ; आरोपी शिवसद्ध बुळळा !  खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जात वैधता प्रमाणपत्र सह अनेक जन आरोपीच्या पिंजऱ्यात …

सोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या शिवसद्ध बुळ्ळा याच्या घर झडतीत सापडलेल्या कागदपत्रातून नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरात आढळलेल्या एका कागदपत्राद्वारे 2015 च्या प्रकरणात देखील त्याला आरोपी करण्यात आले आहे. तर बुळ्ळाच्या घरात सापडलेल्या तीन दाखल्यांची नोंद ही तहसील कार्यालयाकडे नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याने असे किती दाखले तयार केलेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतंय.
सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील तडवळ या गावात राहणाऱ्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप पाहून तुम्ही देखील डोक्याला हात मारुन घ्याल. सोलापूरच्या जात वैधता पडताळणी समितीने अवैध ठरवलेला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा दाखला याच महाशयाने तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शिवसिद्ध बुळ्ळा हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून वैद्यकीय कारणामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र पोलिसांना चौकशीत बुळ्ळाच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रातून रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे

त्याच्या सोलापुरातील दोन आणि अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील एका घरात शोध घेण्यात आला. यामध्ये पोलिसांना काही कागदपत्रे हाती लागली. याच कागदपत्रांचा तपास जेव्हा पोलिसांनी केला तेव्हा धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरातून नितीन साळुंखे नावाच्या व्यक्तीचा एक दाखला आढळून आला. 2015 साली सुमारे 200 बनावट जात प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी जात पडताळणी समितीने पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या दाखल्यांपैकी एक दाखला म्हणजे नितीन साळुंखे यांचा दाखला होता.

जात पडताळणी समिती कार्यालयात काम करणाऱ्या दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी असलेली एक महिला शिवसिद्ध बुळ्ळा याच्या मालकिच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती असं पोलिस तपासात समोर आलं. त्यामुळे 2015 च्या या प्रकऱणात देखील शिवसिद्ध बुळ्ळा याला आता आरोपी करण्यात आलं आहे. बुळ्ळा याची रुग्णालयातून मुक्तता झाल्यानंतर या प्रकरणात पोलिस त्याच्या कोठडीची मागणी न्यायलयाकडे करु शकतात.

या सोबतच शिवसिद्ध बुळ्ळा याची मुलगी, भावजय आणि गावातील एका व्यक्तीचे जातीचे दाखले देखील घर झडतीत सोलापुरच्या गुन्हे शाखेला मिळाले होते. मात्र जेव्हा गुन्हे शाखेने अक्कलकोट तहसीलदारांना या दाखल्याबाबत माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडे देखील या दाखल्यांसंदर्भात कोणतीच नोंद नसल्याचं देखील उघड झालंय.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला हरवल्याची तक्रार याच शिवसिद्ध बुळ्ळा यांने वळसंग पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांना दिलेल्या अर्जात आणि खासदारांच्या दाखल्यावरील अक्षरात साम्य आढळल्याच्या संशयातून पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र अटकेवेळी त्याच्या घरातून अक्कलकोटच्या तहसीलदारांचे शिक्के देखील आढळून आल्याचं पोलिस सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे शिवसिद्ध बु्ळ्ळा यांने या शिक्क्यांचा वापर करुन किती बनावट दाखले तयार केले असतील याचा अंदाज बांधणे देखील कठीण आहे.

अक्कलकोट तालुक्यात बोगस दाखले सादर करुन विविध योजनांचे अनुदान लाटल्याचा आरोप या पूर्वी देखील करण्यात आला आहे. 2012-13 आणि 2015-16 या वर्षात शासनाच्या अनेक योजना बनावट कागदपत्र सादर करुन लाटल्याचं सिद्ध झालं होतं. या प्रकरणात 2017 साली पुणे विभागाचे तत्कालीन उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप कोणतेही गुन्हे या प्रकरणात दाखल झालेले नाहीत असा आरोप हालहळ्ळी (मै) गावचे माजी सरपंच विश्वनाथ विठ्ठल इटेनवरु यांनी केलाय.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा दाखला अवैध असल्याचा निर्वाळा सोलापूरच्या जात वैधता पडताळणी समितीने दिला. मात्र त्याबाबत आता उच्च न्यायलयात सुनावणी सुरु आहे. मात्र या प्रकरणात आरोपी असलेल्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरझडतीत आढळलेल्या कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सोलापूर गुन्हे शाखा तपास करत आहे. त्यांना केवळ याच प्रमाणपत्राबाबत तपास करण्यासाठी मर्यादा आहेत. मात्र शिवसिद्ध बुळ्ळा याने नेमकं किती लोकांना बनावट कागदपत्रे बनवून दिली. आणि त्या कागदपत्रांचा वापर करुन कोण कोण शासकीय सेवेत, राजकारणात किंवा आणखी कुठे आहे याच तपास करण्याची गरज आता निर्माण झालीय.

Tags: खासदारजात पडताळणी समितीसोलापूरसोलापूर ग्रामीण पोलीस

Related Posts

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?
देश-विदेश

आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

June 11, 2025
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!
क्रीडा

सदाशिवराव देठे निवासी प्रशाला चांदापुरी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत मुले पास दहावीचा घवघवीत निकाल….!

May 13, 2025
आज पासून दहावी च्या परीक्षेला सुरवात..
महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या…असा पहा निकाल…!

May 4, 2025
स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
Uncategorized

स्वराज्य न्याय निवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

May 4, 2025
Next Post
महाविकास आघाडी सरकारनेच मेडद गणाला न्याय दिला.- सौ प्राजक्ता वाघमारे. अर्थसंकल्पात 1.5 कोटी मंजूर..स्वप्नील वाघमारे प्रयत्नाला यश!

महाविकास आघाडी सरकारनेच मेडद गणाला न्याय दिला.- सौ प्राजक्ता वाघमारे. अर्थसंकल्पात 1.5 कोटी मंजूर..स्वप्नील वाघमारे प्रयत्नाला यश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .