• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
February 12, 2021
in Uncategorized
0
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जेजुरी प्रतिनिधी – भाजप आमदार गोपीचंद नेहमीच चर्चेचा विषय बनत आहेत . त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्यासह त्याच्या काही कार्यकर्त्यांनी जेजुरी गडावर गोंधळ घालत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी जेजुरी देवस्थानच्या काही कर्मचाऱ्यांसोबत त्यांची झटापट झाल्याची घटनाही याठिकाणी घडली आहे. इतकेच नव्हे तर यावेळी पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.
खरतरं, खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र आज पहाटे अचानक भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांनी शारदा पवार यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.

यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, अखंड भारताचे दैवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा जेजुरी संस्थानाने उभारला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी उपेक्षित समुदायासाठी मोठं काम केलं आहे. त्यांचा पुतळा उभारण्याचं चांगलं काम संस्थाननं केलं आहे. या पुतळ्याचं अनावरण उद्या शरद पवार यांच्या हस्ते करण्याचं ठरवलं होतं. पण, शरद पवारांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावताना विचार करावा. कारण त्यांच्या आणि अहिल्याबाई यांच्या विचारात फार तफावत आहे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या पुतळ्याच्या पायावर माल्यार्पण करुन उद्घाटन झालं असं जाहिर करतो, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर, महाराष्ट्रातील आमच्यासारख्या अनेक युवामित्रांचं म्हणणं होतं की शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या हस्ते उद्घाटन होणं हे अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखं आहे. आमचा पुतळा अनावरणाला विरोध नाही. मात्र भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. शरद पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही या पुतळ्याचं उदघाटन करु नये, असंही पडळकर म्हणाले.

Tags: BJPComplaint against bjp mlaGopichand padal karNcpPolice complaint against gopi chandSharad pawar

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post
🎯 धर्म परिवर्तन केलेल्या दलितांना आरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत—- कायदा मंत्री रविशंकर प्रसाद🎯

🎯 धर्म परिवर्तन केलेल्या दलितांना आरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत---- कायदा मंत्री रविशंकर प्रसाद🎯

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .