निरा नरसिंहपुर : दिनांक – 11,
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून त्यामध्ये पत्रकारांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पत्रकारांच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना दीर्घायुष्यासाठी मार्गदर्शन करण्याचा स्तुत्य उपक्रम इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्यवस्थापनाने राबविला असून हा उपक्रम स्तुत्य व आदर्श आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा यांनी केले. इंदापूर येथील इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंदापूर तालुक्यातील पहिल्याच कॅथलॅब सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अनिल शिर्के, संचालक मनोज वाघमोडे, डॉ. सचिन बिचकुले, पत्रकार संघ सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष धनंजय कळमकर पाटील यांच्या हस्ते तर कॅथलॅब सेवेचा शुभारंभ हृदयरोग तज्ञ डॉ. रोहन हेगडे, ज्येष्ठ फिजिशियन डॉ. अविनाश पाणबुडे यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिराचा समारोप अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष आटोळे व सचिव संदीप बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, जिल्हा संघटक राजेंद्र कवडे देशमुख, सुरेश जकाते, शैलेश काटे, महेश स्वामी, कैलास पवार यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.यावेळी पत्रकारांची ईसीजी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, क्रियाटीनीन तर हाय रिस्क पत्रकारांच्या टूडी इको ( हृदयाची सोनोग्राफी ), कार्डियाक असेसमेंट, लिफिड प्रोफाइल आदी तपासण्या देखील करण्यात आल्या.यावेळी डॉ. अविनाश पाणबुडे म्हणाले, इंदापूर हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून इंदापूर परिसरात अपघाताचे वाढते प्रमाण आहे. मात्र कॅथलॅब नसल्यामुळे गंभीर रुग्णांना पुणे, सोलापूर, अकलूज, बारामती येथे पाठवावे लागत होते. त्यातील अनेक रुग्णांना रस्त्या तच मरण येत होते मात्र ही सुविधा आम्ही काही डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू केल्याने आता अनेक रुग्णांना जीवदान मिळणार आहे. याच रुग्णालयात महात्मा फुले तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना प्रथमच कार्यान्वित झाल्याने आता पाच लाख रुपयांचे उपचार मोफत मिळणार आहेत. गरीब रुग्णांना देखील त्याचा फायदा होणार आहे. कार्डिओलॉजीस्ट डॉ. रोहन हेगडे यांनी विविध हृदयविकार टाळण्या साठी योग प्राणायाम, संतुलित आहार, दैनंदिन व्यायाम, ताणतणावाचे व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण या विषयी मार्गदर्शन केले. इंदापूर तालुक्यातील पहिल्या कॅथलॅब सुविधेमुळे आता रुग्णांवर इंदापूर येथे अँजिओप्लास्टी करणे देखील शक्य झाले असून त्यामुळे आता रुग्णांचे मोठ्या शहरातील फेऱ्या वाचणार असल्याचे डॉ. हेगडे यांनी सांगितले.डॉ. मंगेश पाटील, डॉ. अमोल रासकर, डॉ. अतुल वणवे, डॉ. सचिन बिचुकले, डॉ अमीर मुलाणी, डॉ. अर्जुन नरुटे, डॉ. शैलेश काळेल, डॉ. श्रद्धा भोसले, डॉ. प्रणाली सरगर यांनी पत्रकारांच्या तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. किसन शेंडे, डॉ. शिवाजीराव खबाले, डॉ. राकेश कर्डिले, डॉ.महेश रुपनवर, डॉ. रियाज पठाण, डॉ. रविराज शिंदे, डॉ. पंकज दोशी, डॉ. भाग्यवंत टिळे, डॉ. पाडूळे, डॉ. संतोष शेलार, डॉ. सचिन फडे, शितल बोरा, हमीद आतार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वागत इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. अनिल शिर्के यांनी केले. यावेळी प्रास्ताविकात डॉ. शिर्के यांनी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधांची माहिती दिली. सूत्रसंचलन डॉ. मनोज वाघमोडे यांनी तर ज्येष्ठ पत्रकार तानाजी काळे यांनी आभार प्रदर्शन केले.
