प्रतिनिधी,
अधिक माहिती अशी की गोपनीय बातमीदार यांचे मार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे भुईंजे गावाच्या हद्दीमध्ये इसम नामे रोहिदास भानुदास गळके वय 54 वर्ष राहणार भुईंजे तालुका माढा हा त्याची राहते घरी गांजा विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी 21/5/2025 रोजी सायंकाळी 5/45 वा पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्या ताब्यात 19 लहान प्लास्टिक पुड्या त्यामध्ये 180 मिलि ग्रॅम गांजा किंमत 2000/= रुपयाचा गांजा जवळ बाळगले असताना मिळून आला त्यावरून त्याच्या विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर इसमास अटक करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे टेंभुर्णी हद्दीमध्ये जुने महादेव मंदिराजवळ चे झोपडीचे ठिकाणी इसम हे गांजा सेवन करत आहेत अशी माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी छापा टाकला असता इसम नामे मनोज दत्तात्रय लोंढे वय 28 राहणार घरकुल टेंभुर्णी हा चिलीम च्या साह्याने गांजा सेवन करत असताना मिलून आला त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच जनता विद्यालयाच्या पाठीमागे बंडलकर यांचे घराजवळ काही इसम हे गांजा चे सेवन करत आहे त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे अभिमान किसान चव्हाण वय 40 राहणार टेंभुर्णी हा चिलीमच्या साह्याने गांजा सेवन करत असताना मिलून आला त्याच्याविरुद्ध एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक साहेब, मा. प्रीतम यावलकर. अपर पोलीस अधीक्षक साहेब, मा. अजित पाटील, उपविभागीय अधिकारी करमाळा यांचे मार्गदर्शना खाली नारायण पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के , पुरुषोत्तम धापटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास रणदिवे, पोलीस हवालदार प्रदीप पर्वते, संदीप गिरमकर, पोलीस कॉन्स्टेबल महेश साळी, प्रकाश जगदाळे, आकाश भोजने, गणेश इंगोले, सर्जेराव करचे, चालक समाधान धोत्रे , चिट्टलवाड, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुनम शिंदे यांनी केली आहे