• होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Thursday, June 26, 2025
जनविद्रोही
No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
जनविद्रोही
ADVERTISEMENT
Home Uncategorized

इंदापूर तालुका सकल जैन समाजाच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर मुकमोर्चा.

जनविद्रोही प्रतिनिधी by जनविद्रोही प्रतिनिधी
April 25, 2025
in Uncategorized
0

🌀पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना सामूहिक नवकार मंत्र म्हणून श्रद्धांजली, अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी.

इंदापूर, डॉ. संदेश शहा.मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना देखील मुंबई विले पार्ले येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बेकायदेशीरपणे पाडल्याच्या निषेधार्थ इंदापूर तालुका सकल जैन समाजाच्या वतीने काळया फिती लावून इंदापूर तहसील कार्यालयावर दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला. श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, भारतीय जैन संघटनेचे इंदापूर शहर अध्यक्ष धरमचंद लोढा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा संपन्न झाला. यावेळी तहसीलदारजीवन बनसोडे यांना नरेंद्र गांधी, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. इंदापूर येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पासून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. संभाजी चौक, नेहरू चौक, मुख्य बाजारपेठ, शिवाजी चौक, बाबा चौक, जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, संविधान चौक ते मोर्चाचा समारोप इंदापूर तालुका प्रशासकीय भवन प्रांगणात करण्यात आला. मोर्चात इंदापूर, भिगवण, वालचंदनगर, पळसदेव, जंक्शन, निमगाव केतकी, निमसाखर, अंथुर्णे, लासूर्णे पंचक्रोशीतील हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी डॉ. श्रेणिक शहा, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा पदाधिकारी सचिन बोगावत, वालचंदनगर येथील सारिका वैभव गांधी यांची भाषणे झाली. यावेळी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अतिरेक्यांचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी मुंबई विले पार्ले येथील ३० वर्षांपूर्वीचे श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्या स तात्काळ बडतर्फ करावे, मंदिर पुन्हा बांधून द्यावे,जबलपूर येथे भाजप नेत्यांनी जैन समाजावर चुकीचे वक्तव्य केले आहे, संबंधित नेत्यांनी जैन समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागावी, मध्य प्रदेश येथे जैन साधूवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, असे प्रकार पुन्हा होवू नयेत यासाठी विशेष कायदा करावा, पायी विहार करणारे जैन साधू, साध्वी यांना सर्वत्र पोलीस संरक्षण मिळावे, जैन तीर्थक्षेत्रावरील वाढती अतिक्रमणे तात्काळ थांबवावीत या मागण्या मोर्चेकऱ्यांनी प्रशासनास केल्या.यावेळी महेंद्र बोगावत, पंकज दोशी, कमलेश गांधी, अमोल शहा, डॉ. शीतल शहा, प्रकाश बलदोटा, मिलिंद दोशी, महेंद्र गुंदेचा, पारसमल बागरेचा, अरुण दोशी, सागर दोशी, चंद्रशेखर दोशी, पीयूष बोरा, जवाहर बोरा, संदीप शहा, आदिकुमार गांधी, पवन भालेराव, डॉ. आशिष दोभाडा, सागर कस्तुरे सुकुमार गांधी, साजन चंकेश्वरा, बाहुबली गांधी, महावीर शहा, अरविंद गांधी, शेखर दोशी, उत्कर्ष दोशी, प्रीतम भालेराव, अनिल गांधी, स्वप्नील शहा, अभय गांधी, डॉ. सुदर्शन दोशी, स्वरूप दोशी, स्वप्नील दोशी, सचिन गांधी, स्वराज गांधी, मंगेश गांधी, वकील वैभव गांधी, धनंजय गांधी, नंदिनी महावीर दोशी, मंजुषा विनोद दोभाडा, भारत दोभाडा, मोहन जोशी, जवाहर जोशी, मनोज शहा, अभय रायसोनी, गिरीश मुनोत, संदीप बोगावत, किरण रायसोनी, संतोष गांधी, महेश रायसोनी, प्रकाश खाटेर, उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ. संदेश शहा यांनी केले.यावेळी मधुकर भरणे, भरत शहा, कृष्णा ताटे, हमीद आतार, प्रमोद राऊत, प्रवीण पवार, सोमनाथ जाधव, खुशाल कोकाटे या मान्यवरांनी मोर्चास पाठिंबा दिला.

Related Posts

Uncategorized

इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.

June 19, 2025
Uncategorized

प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.

June 19, 2025
Uncategorized

चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.

June 17, 2025
Uncategorized

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.

June 12, 2025
Next Post

प्रा.डॉ. भोर सर यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आर्थिक
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • माळशिरस तालुका
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सोलापूर जिल्हा

ताज्या बातम्या

  • इंदापूर तालुक्यामध्ये निरगुडे गावात महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनिंचा सन्मान करण्यात आला.
  • प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न.
  • चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा.
  • बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांना पाठिंबा : हर्षवर्धन पाटील-बच्चू कडू यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची दूरध्वनीवरून चर्चा!-बच्चू कडू यांचे अन्न त्याग आंदोलन सुरु.
  • आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वादात…?

© 2021 janvidrohi.com .

No Result
View All Result
  • होम
  • माळशिरस तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शेतीविषयक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021 janvidrohi.com .