निरा नरसिंहपुर: दिनांक-4,
प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, शालेय शिक्षण पुणे व सलाम फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित होण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर उपक्रम राबवित आहे.लोयोला हायस्कूलने मुख्य प्रवेशद्वाराच्या शंभर यार्ड परीसरातील क्षेत्रात पिवळी रेषा रेखांकित करुन धुम्रपान निषिद्ध प्रतिबंधित क्षेत्र रेखांकित करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभाग (म.रा.) व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रमात सहभाग नोंदवून ही शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून प्रमाणपत्र देऊन घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था आणि त्यांचे परिसर तंबाखूमुक्त व्हावेत, यासाठी शालेय शिक्षण विभागाने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवित आहे. सलाम मुंबई फाऊंडेशन ही संस्था तंबाखूमुक्त शाळेचे सुधारित नऊ निकष विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानात लोयोला हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी शाळेत तंबाखू सेवनास बंदी असल्याची नोटीस काढून सूचना दिली आहे. तंबाखूचे दुष्परिणाम याची माहिती देण्यासाठी शाळेत वेळोवेळी विविधउपक्रमांतून कलाशिक्षिका सौ. भारती रंगनाथ भगत यांनी जनजागृती केली आहे. तंबाखूमुक्त शाळा यावर विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र, निबंध स्पर्धा, तंबाखू मुक्ती विषयक घोषवाक्य स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम जनजागृती अशा अनेक उपक्रमातून जनजागृती केली आहे. या संदर्भात शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘तंबाखूमुक्त क्षेत्र’ असा फलक लावण्यात आला आहे. शाळेत राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे डाएट प्राचार्य महेश शेंडकर , डॉ.प्रभाकर क्षीरसागर, वरिष्ठ अधिव्याख्याता,डाएट पुणे ,प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री . संजय नाईकडे, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री.भाऊसाहेब कारेकर, औंध यूआरसी येथील सौ.वैशाली शेवाळे मॅडम,सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक सारिका कदम व पुणे जिल्हा समन्वयक राकेश कसारे व लोयोला हायस्कूल येथील मुख्याध्यापक फादर नेल्टन थॉमस , शाळेच्या माध्यमिक शिक्षक समन्वयीका सौ.सोफिया मॅन्युअल ,विनिता चावडी, शायनी सत्यन,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.
