मोडनिंब प्रतिनिधी,
मोडनिंब ग्रामपंचायत मध्ये राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
राजे उमाजी नाईक यांची 233 जयंती मोडनिंब ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन मोडलिंब चे जेष्ठ नेते व माजी सरपंच बाबू तात्या सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमितजी कोळी युवा नेते किरण तोडकरी ग्रामपंचायत सदस्य दत्ता बापू सुर्वे सदाशिव पाटोळे उपस्थित होते.
यावेळी नानासाहेब मंडले यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास मधुकर जाधव रामचंद्र जाधव अमित मंडले समाधान घाडगे बाळा चव्हाण सुकुमार जाधव पोपट कोळी चांगदेव पाटोळे सिद्धांत मांडले उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बिबीशन गायकवाड इत्यादी उपस्थित होते व सर्वांचे आभार नानासाहेब मंडले यांनी मानले.
