पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुर तालुक्यातील सुस्ते येथील रेवनसिद्ध काशिनाथ चव्हाण यांना ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘ज्ञानेंद्रपति की कविता का शैलीवैज्ञानिक अध्ययन’ या विषयावर विद्यावाचस्पति (पीएच.डी.) पदवी प्राप्त झाली.

त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना चे संचालक डॉ. सदानंद भोसले सर यांचे मार्गदर्शन लाभले. रेवनसिद्ध चव्हाण सध्या फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) पुणे येथे हिंदी विषयाचे अध्यापन कार्य करत आहेत.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पी. एच. डी पदवी प्राप्त केली आहे. एम. ए. एम.फील.नेट,पी. एच.डी असे महत्वपूर्ण डिग्री मिळवल्या असल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.चव्हाण सरांचे पंढरपूर तालुक्यात व विवीध ठिकाणाहून अभिनंदन होत आहे.
