श्रीपूर
येथील आंबेडकर चळवळीतील एक सुजाण मनमिळाऊ अभ्यासू कार्यकर्ते भरत नामदेव बनसोडे वय 68यांचे आज पहाटे हृदयाच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे त्यांनी श्री चंद्रशेखर विद्यालयात क्लार्क म्हणून सेवा बजावली होती भरत बनसोडे हे श्रीपूर येथील दलित पँथरचे पहिले अध्यक्ष होते ते उत्कृष्ट व्हालीबाल खेळाडू होते त्यांना वाचनाची आवड होती अतिशय मनमिळाऊ दिलदार व्यक्तीमत्व असलेले भरत बनसोडे यांचा सर्व ठिकाणी वावर व मोठा मित्र परिवार आहे ते अतिशय विनम्र बोलका स्वभाव असलेले सर्वपरिचित व्यक्तीमत्व होते त्यांनी बी आर ए म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नावाने श्रीपूर येथे व्हालीबाल संघ काढला होता येथील अनेक संघटना कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष होते तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे संचालक म्हणून ही कार्यरत होते श्रीपूर येथील जुन्या घटना आठवणी यांची त्यांना इत्यंभूत माहिती असायची ते गोष्टीवेल्हाळ होते अनेक घटना प्रसंग याचे वर्णन ते सांगुन तो प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभा करत सर्व स्तरातील लोकांत त्यांचा वावर मित्रपरिवार होता त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुली नातवंडे जावई मोठा भाऊ असा मोठा परिवार आहे भरत बनसोडे यांचे आकस्मिक निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे त्यांच्या जाण्याने श्रीपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
