नीरा नरसिंगपूर: दिनांक: १७
प्रतिनिधी: डॉ. सिद्धार्थ सरवदे.
नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे नरसिंह जयंती नवरात्र उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या जंगी कुस्त्या ने लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या मैदानामध्ये जवळपास ४५०ते ५०० पैलवानांनी हजेरी लावली.
या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय श्री राम सातपुते साहेब, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय आप्पासाहेब जगदाळे साहेब, प्रदीप मामा जगदाळे, वस्ताद रावसाहेब आप्पा मगर ,अमर भैया जगदाळे,दयानंद महाडिक, नागा भाऊ खटके, प्रशांत भैय्या कोकाटे पाटील, दत्ता भैया मगर, श्रीराज भैय्या भरणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यात्रा कमिटी निरा नरसिंहपुर यांच्यावतीने प्रमुख उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
यात्रा कमिटी निरा नरसिंहपुर यांच्या वतीने अध्यक्ष प्रशांत भैय्या बादले पाटील ,खजिनदार विठ्ठल काका देशमुख ,डॉक्टर संदीप केसकर ,उपाध्यक्ष उमेश घोडके, गणेश जगताप, सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, दशरथ दादा राऊत, राहुल माने, पप्पू गोसावी, सुनील मोहिते प्रभाकर जगताप, सतीश काकडे यांनी अतिशय छान आणि नियोजन बद्ध व्यवस्थापन केले होते.
वस्ताद सचिन कदम, माजी सरपंच अण्णासाहेब काळे, माजी उपसरपंच विलास ताटे, माजी उपसरपंच नरहरी काळे, किशोर मोहिते, तानाजी पावसे, अतुल घोगरे, अमर भोसले, मनोज मासुळे, विजय सरवदे, आनंद काकडे संतोष मोरे ,बापू जगदाळे, नितीन सरवदे, गौतम सरवदे, राजेंद्र देशमुख, सिद्धेश्वर काळे, अतुल हावळे, नागनाथ गव्हाणे ,नाथाजी मोहिते, गणेश जगदाळे, बळीराम गलांडे, अण्णासाहेब फरतडे, तानाजी जगदाळे,राजेंद्र बळवंतराव यांनी कार्यक्रमाचे आयोजन अतिशय छान पद्धतीने पार पाडले.
या जंगी कुस्त्या च्या आखाड्यामध्ये शंभर रुपये दोनशे रुपये आणि पाचशे रुपये च्या जवळ जवळ शंभर ते दीडशे कुस्त्या पैलवानांनी केल्या. त्याच्यानंतर एक नंबरची मोठी कुस्ती ही उपमहाराष्ट्र केसरी पै.माऊली कोकाटे विरुद्ध पै. विष्णू खोसे यांच्यामध्ये झाली याचे बक्षीस रक्कम 75 हजार रुपये होती .दोन नंबर ची कुस्ती हि पै.सिद्धराज ओमने विरुद्ध पै. मेघराज शिंदे यांच्या मध्ये झाली याचे बक्षीस 50 हजार रुपये होते. तिसरी कुस्ती ही पै.नामदेव कोकाटे विरुद्ध पै.अमित सुळ यांच्याविरुद्ध झाली याचे बक्षीस तीस हजार रुपये होते. चौथी कुस्ती पै. दीपक मोहिते टनु विरुद्ध पै. अभिजीत तळेकर यांच्या मध्ये झाली यांचे बक्षीस पंचवीस हजार रुपये होते. नीरा नरसिंगपूर येथील जंगी कुस्त्याच्या आखाड्याचे बक्षीस अंदाजे तीन लाख रुपये पर्यंत देण्यात आले. अशा पद्धतीने श्री नरसिंह जयंती नवरात्र उत्सव हा नरसिंहपूर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अतिशय छान व उत्साही पद्धतीत पार पडला.

