जगद् गुरु तुकाराम महाराज की जय, विठ्ठल रुख्माई-विठोबा रुखमाई, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा नामघोषात श्रीपुर (आनंद नगर) मध्ये तुकाराम महाराज बीज मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली.
दुपारी १२वाजता पुष्पवृष्टी व त्या नंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीपुर मधील महिला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला.त्यांनी अतिशय छान प्रकारे तो कार्यक्रम सादर केला.
त्या नंतर ह.भ. प.धनंजय गुरव यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तुकाराम महाराजांच्या जीवनातील आनेक गोष्टीचा,त्यांच्या कार्याचा उलगडा त्यांनी आपल्या कीर्तनातून केला.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री.विनायक जाधव यांनी केले होते.दर वर्षी नित्य नियमाने ते तुकाराम बीज कार्यक्रम साजरा करतात.यंदाचे हे ३० वे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.