🔅विशेष कर्याची दखल घेऊन करण्यात आला सत्कार.🔅
अकलूज,
सेन्ट्रल ह्यूमन राइट संघटनेच्यावतीने मा. डॉ. कुमार लोंढे साहेबांनी
कोरोना काळात ५० लाख रु. विम्याची
(विजतंत्रिकी, वायरमन)
मागणी महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री आदरणीय डॉ. नितीनजी राऊत यांच्याकडे केली होती.
त्यांच्या मागणीचा सकारात्मक निर्णय होऊन शासन निर्णय झाला व राज्यातील पहिला लाभ पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावातील करडे या कुटुंबास झाला. त्यांना ३० लाखाचा धनादेश (चेक) भेटला.

त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.डॉ. धवलसिंहजी मोहिते -पाटील यांनी मा.डॉ.कुमार लोंढे साहेब (सेंट्रल ह्यूमन राइट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष) यांचा सत्कार केला.
यावेळी कॉग्रेस पक्षाच्या व इंटक कामगार संघटनेत प्रवेश केलेल्या व्यक्तींचा देखील सत्कार डॉ.धावलसिंह यांच्या हस्ते करण्यात आला .
डॉ.कुमार लोंढे साहेब सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, “धवल दादा सारखे व्यक्तिमत्त्व पाठीवर हात ठेवून लढायचे बळ देतात.”
माझा जो सत्कार काँग्रेस पक्ष व डॉ.धवलजी मोहिते पाटील यांनी केला आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे, कारण असे पक्ष व माणसे नेहमीच लढण्याचे बळ देतात.
यावेळी काँग्रेस चे सतीश नाना पालकर,इंटकरत्न पाखरे,पंढरपूर तालुका अध्यक्ष पाटील,डॉ.आदिनाथ रूपनवर,सुधीर रास्ते, ज्योती कुंभार,बाळासाहेब मगर नेते,गिरीश शेटे,केपीजेएस मॅनेजर राजू खरात,नवनाथ साठे,वायरमन अनिल बाबर,समाधान खरात इ. अनेक मान्यवर उपस्थित होते.