श्रीपुर,
महाळुंग – श्रीपुर नगरपंचायतिचे नूतन उपनगराध्यक्ष मा. भीमराव रेडे – पाटील उर्फ पाटील नाना यांनी आज( दि.२८ रोजी ) श्रीपुर परिसरातील वार्ड क्रमांक १२ व १३ ला भेट दिली.


सर्वप्रथम यांनी वार्ड क्रमांक १३ मधून त्यांना निवडून दिल्याबद्दल सर्व जनतेचे आभार व्यक्त केले.
त्यांनी सर्व जनतेच्या मुलभूत समस्या काय आहेत त्या जाणून घेतल्या.
वार्ड क्रमांक १२ व १३ मध्ये सांडपाण्यासाठी करण्यात आलेल्या गटारांची झालेली दुरावस्था त्यांनी स्वतः फिरून पाहिली.
त्यावेळी त्यांच्या बरोबर तेजसभाऊ रेडे- पाटील,आबा जाधव,अमोल बनसोडे, जयकुमार जाधव, गोटू (काका) देऊसकर, जगदीश थिटे,अनिल जाधव, विष्णू माने,सदानंद बनसोडे ( माळशिरस तालुका अध्यक्ष -C.H.R.S) व संदीप लांडगे हे उपस्थित होते.
येत्या काळात लवकरात- लवकर आपण त्या गटारी भूमिगत करून देऊ असा त्यांनी शब्द दिला.