मार्गदर्शक आणि विद्यार्थीही मीच..
– श्रेयस कांबळे
कोरोनाच्या परिस्थितीमुळे मला कॉलेजमध्ये जाता आलं नाही किंवा प्रत्यक्ष शिक्षकांचे शिकविणं अनुभवता आलं नाही आणि लातूर कोटा यांसारख्या ठिकाणी प्रवेश नसल्याने इतर विशेष मार्गदर्शनही मिळालंन नाही, म्हणून मलाच माझा मार्गदर्शक आणि मी विद्यार्थी या दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागल्या, असे भावनोद्गगार श्रेयस कांबळे याने काढले.नीट २०२१ च्या परीक्षेत ५६५ गुण प्राप्त करीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल सारनाथ बुद्ध विहार येथे समस्त बौद्ध समाज, सारनाथ बौद्ध बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि डॉ. बी. आर् .आंबेडकर बचत गट, अकलूज यांचे वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात तो बोलत होता.अध्यक्षस्थानी माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नाशिकआबा सोनवणे, भिमराव चंदनशिवे गुरुजी, सतिश सरतापे सर, विजयकुमार भोसले सर आदी उपस्थित होते.तो पुढे म्हणाला की,१४ एप्रिल निमित्ताने १२-१३ तास अभ्यास करण्याचा संकल्प आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन तो पूर्णत्वास नेला.नियोजनपूर्वक अभ्यास, अधिकाधिक उजळणी कठोर परीश्रम व सर्व कुटुंबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे हे यश मिळाले.
यावेळी नुकतेच मुख्याध्यापिका म्हणून बढती मिळाल्याबद्दल श्रेयसची आई सौ. कांताबाई कांबळे यांचाही सत्कार सौ.मनिषा जाधव यांच्या हस्ते तर वडील सुनील कांबळे सर यांचा सत्कार नाशिकआबा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सौ. व श्री.कांबळे सर या उभयतांनी आपले आभारपर मनोगत व्यक्त केले.तर भिमराव चंदनशिवे गुरुजी आणि प्रल्हाद गायकवाड यांनी गौरवपर समयोचित भाषण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत जाधव गुरुजी यांनी तर आभारप्रदर्शन मनोहर कोळसे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रविण लोंढे सर, बाबासाहेब गायकवाड, संतोष पाटील, आणि प्रविण साळवे यांनी केले.यावेळी बहुसंख्य समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.