जनसेवा संघटनेच्या आंदोलनाला यश..!!
आढावा घेऊन पंधरा दिवसात गावठाणा मधील लाभधारकांना जागा वाटप करणार प्रांत अधिकारी शमा पवार मॅडम यांनी दिले आदेश….!!
अकलुज मधील गावठाण येथील जागावाटप संदर्भात गेली अनेक वर्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटना लाभधारकांना जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे आज त्या प्रयत्नांना यश आले असं कुठेतरी दिसत आहे. प्रांत अधिकारी शमा पवार मॅडम तहसीलदार निंबाळकर साहेब यांनी पंधरा दिवसात जागा वाटप करण्याचे लेखी पत्र दिले.
यासाठी जनसेवा संघटनेने अर्ध भूसमाधी तब्बल सात तास घेतलेली होती चार फुट खड्डय़ात ही समाधी ग्रामपंचायत सदस्य ज्योतीताई कुंभार,महेश शिंदे ,निहाल शेख,सोमनाथ बीटे यांनी घेतली होती.
सुमारे दोन तास मोठा पाऊस चालू असताना हि जोपर्यंत लेखी आदेश देत नाही तोपर्यंत आंदोलनं सोडले नाही यावेळी अकलुज ग्रामपंचायत सदस्या सौ.उर्वशीराजे मोहिते पाटील या भर पावसात आंदोलका समवेत उपस्थित होत्या लेखी आदेश घेऊनच सुमारे सात चाललेले आंदोलन स्थगित करण्यात आले. ज्या जागी आंदोलन झाले त्या जागी ग्रामपंचायत सदस्य मा.सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील साहेब यांनी वृक्षारोपण केले.या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरणजी साठे, लक्षवेधी संघटनेचे अनिल जी साठे, बहुजन मुक्ती पार्टी चे काकासाहेब जाधव, मनसेकडून सुदाम आवारे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी कडून सोमनाथ जी भोसले,आरपीआय आंबेडकरी गट कडून विजू भाऊ कोकणे यांनी समक्ष येऊन पाठिंबा दिला.यावेळी जनसेवा संघटनेचे सतिशनाना पालकर,रणजितसिह देशमुख, राजाभाऊ गुळवे,सुधीर रास्ते, नवनाथ साठे मयूर माने, राणीताई बंदपट्टे,जावेद तांबोळी, रघुनाथ साठे, सागर खंडागळे, शंकर डावरे,शांताबाई शहापुरे, तेजस उबाळे,तेजस गायकवाड संजय गाडे,फिरोज देशमुख ,सागर देशमुख,दिपक सुत्रावे,हुसेन शेख,इब्राहिम मुलाणी,उपस्थित होते.